Breaking News

धाडी समाजाचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी असताना भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशाचप्रकारे रायगड जिल्हा आणि नवी मुंबईत राहणार्‍या धाडी समाजाच्या रहिवाशांनी रविवारी (दि. 24) सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, नगरसेवक संतोष शेट्टी, प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास कोडुरू, डेमारधाडी दरबार ट्रस्ट रायगडचे अध्यक्ष आनंद शेरावत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि धाडी समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply