मुरूड : प्रतिनिधी
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी शुक्रवारी (दि. 13) स्वच्छता मोहीम राबवून मुरूड तहसील कार्यालय परिसर स्वच्छ केला. तहसीलदार नमन गावित यांच्या विनंतीनुसार प्रतिष्ठानत़र्फे उदय दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 97 श्रीसदस्यांनी शुक्रवारी सकाळी 7 वाजता तहसीलदार कार्यालय परिसरात साफसफाईला सुरुवात केली. 11 वाजेपर्यंत त्यांनी कार्यालय परिसरातून 14 टन कचरा गोळा केला. तो टेम्पोतून नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राऊंडवर नेला व त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली.