Breaking News

हातावर पोट असलेल्यांना खांदेश्वर पोलिसांची मदत

पनवेल : वार्ताहर

हातावर पोट असलेल्या गोरगरीब बांधवांसाठी मदतीचा हात म्हणून खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवीदास सोनावणे व त्यांचे सहकारी धावले. या बांधवांसाठी त्यांनी गेल्या चार दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ जेवण तसेच मास्कचे वाटप केले आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्यामुळे तसेच शुक्रवार ते सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन कडक पाळण्यात येत असल्याने मोलमजुरी करणारे नाका कामगार तसेच हातावर पोट असलेले बांधव व त्यांच्या कुटुंबीयांचे जेवणामुळे हाल होत होते. ही बाब लक्षात येताच खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवीदास सोनावणे व त्यांच्या पथकाने खाजगी संस्थेचे सहकार्य घेवून गेल्या चार दिवसांपासून या बांधवांना दोन वेळचे जेवण तसेच मास्कचे वाटप केले आहे. आगामी काळात सुद्धा खांदा वसाहत परिसरात अशा प्रकारच्या गोरगरीबांना जास्तीत जास्त मदत करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक देवीदास सोनावणे यांनी दिली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply