उरण : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य समिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेतर्फे महिलांच्या आरोग्याविषयी व उरण येथील विलगीकरण कक्षात होणार्या समस्येबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेत त्यांना कोरोना काळात होणार्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. सर्वसामान्य जनतेला खाजगी दवाखान्याचा खर्च त्यांना परवडत नाही. यात सर्वाधिक बळी महिलांच्या आरोग्याचा जातो, पैसे नसल्यामुळे दुखणे अंगावर काढणे, अवैज्ञानिक उपाय करणे, अंधश्रद्धांना बळी जाणे हे प्रकार महिला वर्गात सर्रास दिसून येतात. या सर्व परिस्थितीत सार्वजनिक आरोग्यसेवा मजबूत करुन जनतेला विशेषतः महिलांना दिलासा मिळावा. तसेच महिलांना विलगीकरण कक्षात आरोग्यदायी व सुरक्षित व्यवस्था करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा नसीमा शेख, सेक्रेटरी प्राची हातिवलेकर, उपाध्यक्ष हेमलता पाटील राज्य उपाध्यक्ष सोन्या गील आदी उपस्थित होते.