Saturday , June 3 2023
Breaking News

वॉर्नरचे झोकात पुनरागमन

गंभीर, शर्माचा विक्रम मोडला

कोलकाता : वृत्तसंस्था

सनराईजर्स हैदराबाद संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध पराभवाचा धक्का सहन करावा लागला. असे असले तरी हैदराबादचा धडाकेबाज डेव्हिड वॉर्नरने 85 धावांची आक्रमक खेळी केली. यासह त्याने गौतम गंभीरचा विक्रम मोडीत काढला.

बॉल टॅम्परिंगमुळे वर्षभर बंदीची शिक्षा भोगणारा वॉर्नर याने आयपीएलमध्ये जोरदार पुनरागमन केले. त्याने 53 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार यांच्या बळावर 85 धावा तडकावल्या. या खेळीच्या जोरावर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके ठोकणारा खेळाडू म्हणून त्याने मान मिळवला. याआधी गंभीर आणि वॉर्नर दोघे 36 अर्धशतके करून संयुक्त पहिल्या क्रमांकावर होते. वॉर्नरने 115 डावांत ही कामगिरी केली; तर गंभीरने 152 डावात 36 अर्धशतके केली होती.

वॉर्नरने मुंबईच्या रोहित शर्माच्या नावावर असलेला विक्रमही आपल्या नावे जमा केला आहे. कोलकाताविरुद्ध सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत वॉर्नरने रोहितला मागे टाकले आहे. सध्याच्या घडीला वॉर्नर 762 धावांसह या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply