Breaking News

‘भाजपची विचारधारा पटवून सांगणार’

माणगाव : प्रतिनिधी

जगावर असलेल्या  कोरोना नामक संकट दूर झाल्यावर  पक्ष नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव तालुक्यातील महिलांना संघटीत करून सामाजिक उपक्रम राबवून त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे पटवून देऊन तालुक्यात भाजप महिला संघटन मजबूत करणार, असा दावा माणगाव तालुका भाजप महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना व्यक्त केला.

शर्मिला सत्वे यांची नुकतीच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार व रायगड जिल्हा भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड.  महेश मोहिते यांच्या आदेशाने माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी माणगाव तालुका भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. यानंतर शर्मिला सत्वे यांनी आपल्या पुढील वाटचालीबाबत प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. शर्मिला सत्वे यांनी सांगितले की, भाजप पक्ष हा लोकांचा हित पाहणारा पक्ष आहे. जनता अडचणीत असताना भाजप पक्ष नेहमीच धावून गेला आहे. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात  कोकणाला मोठा तडाखा बसला. या वादळातील नुकसानग्रस्त भागाची भाजप नेत्यांनी सर्वांच्या अगोदर पाहणी दौरा करून नुकसानग्रस्तांना पक्षामार्फत सर्वात अगोदर मदत पोहचवली. भाजप पक्षाची ही काम करण्याची तत्परता माणगाव तालुक्यातील महिलांना संघटीत करून आपण समजावून सांगणार आहोत. तसेच माणगाव तालुक्यात येणार्‍या काळात कोरोनाचे संकट गेल्यावर विविध सामाजिक उपक्रम महिलांसाठी आपण राबविणार आहेत. भाजप पक्षातील सर्व महिलांना विश्वासात घेऊन आपण माणगाव तालुक्यात पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करून भाजपची विचारधारा, ध्येयधोरणे हे समजातील  शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून केंद्र शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त गोरगरीब जनतेला मिळवून देऊ असा विश्वास सत्वे यांनी व्यक्त केला.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply