पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 449 नव्या रुग्णांची नोंद रविवारी (दि. 26) झाली असून, नऊ जण दगावले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील (महापालिका 135, ग्रामीण 52) 187, खालापूर 63, रोहा 35, उरण 30, माणगाव 28, पेण 23, महाड 19, अलिबाग 18, कर्जत 16, मुरूड 14, सुधागड सहा, पोलादपूर चार, म्हसळा तीन, श्रीवर्धन दोन आणि तळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मृत रुग्ण खालापूर तालुक्यात तीन, पनवेल व म्हसळा प्रत्येकी दोन आणि पेण व महाड प्रत्येकी एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 648 रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 13,834वर गेला असून, मृतांची संख्या 359 झाली आहे. जिल्ह्यात 9522 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने 3697 रुग्ण सक्रिय आहेत.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …