Breaking News

खारफुटीच्या रोपांची लागवड

उरण : प्रतिनिधी

उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांनी रविवारी (दि. 26) जागतिक खारफुटी संवर्धन दिनानिमित्त उलवे शहरालगत असलेल्या मोहा गावाच्या समोरील खाडी किनारी खारफुटीची रोपे लावुन हा दिन साजरा करण्यात आला. खार्‍या जमिनीत फुटणारी झाडे म्हणून यांना खारफुटी तसेच कांदळवन, तिवीर या नावाने देखील म्हणुन ओळखले जाते. या वनस्पतीमध्ये प्रदुषण शोषण्याची ताकद खुप जास्त आहे. मासे, खेकडे, कीटकांचे ही वनस्पती म्हणजे नैसर्गिक अन्न आहे. तसेच सागरी लाटा, उधाण, पुर, मोठे वादळांपासून बचाव करणारी एक नैसर्गिक संरक्षण भिंत म्हणुन कार्य बजावत आहे. या झाडांमुळे पाणी व जमिनीचा समतोल राखला जातो. भविष्यात खारफुटी वाचली तर मानवी जीवन वाचेल ह्या हेतुनेच खारफुटीच्या रोपांची लागवड करुन सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांनी समाजासमोर नवा आदर्श करून दिला आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply