Thursday , March 23 2023
Breaking News

स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहीम

नागोठणे : प्रतिनिधी : जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या सूचनेनुसार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रविवारी (दि. 24) स्मशानभूमी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत नागोठणे विभागाच्या श्री बैठकीच्या 827 सदस्यांकडून पेण, रोहे तालुक्यातील 80 स्मशानभूमीत ही मोहीम राबविण्यात आली. 80 स्मशानभूमीअंतर्गत असणार्‍या गावांची लोकसंख्या 70 हजार असून 38450 चौमी परिसर स्वच्छ करताना सुमारे 30 टन कचरा गोळा केला, असे स्पष्ट करण्यात आले.

Check Also

अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाला सुरुवात

आमदार प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी यांचा पाठपुरावा अलिबाग ः प्रतिनिधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. 22) …

Leave a Reply