मुंबई : प्रतिनिधी – कोरोना योद्धे म्हणून समाजाच्या विविध घटकांमध्ये काम करणार्या डॉक्टर, पोलीस, स्वयंसेवी संस्था, स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी, सफाई कामगार, वैद्यकीय सेवा देणारी सेवक अशांचा सन्मान स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 10) राजभवनात सन्मान करण्यात आला. भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हा उपक्रम राबवला.
या वेळी प्रास्ताविकात अॅड. शेलार म्हणाले की, कोरोना योद्धे म्हणून समाजातील अशी असंख्य माणसे जे काम करीत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यामुळे आम्ही यातील काही प्रातिनिधिक सन्मान आज करीत आहोत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, कोरोना संकटातही समाजातील अनेक माणसे स्वयंप्रेरणेने योद्धे म्हणून मदतीसाठी सरसावले आहेत. सेवाभावी वृत्तीने काम करणार्यांना शोधून त्यांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे.
या कार्यक्रमात डॉ. जलिल पारकर, पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, पोस्टमन महमद रफीक काझी, वॉर्ड आफिसर विनायक विसपुते, योगा प्रशिक्षक सुनयना रेकी, डॉ. सशांक जोशी, आयुर्वेदिक गोळ्या मोफत वाटणारे अमेय हेटे, आरोग्यसेवक विकास देशमुख, मनोरंजन करमारे स्मृती गंध, लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबविणारे गंधारचे कलावंत अव्दैय टिल्लू, सई डिंगणकर तसेच अन्नधान्याची मदत पोहचवणारे किशोर पुनवत, सफाई कामगार रमेश साळुंखे, कोरोना पार्थिवावर अंत्यसंस्कार करणारे विरल त्रिवेदी यांच्यासह एकूण 40 जणांचा सन्मान करण्यात आला.