अलिबाग : प्रतिनिधी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कृषी विभागाने चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रेय काळभोर, तालुका कृषी अधिकारी प्रदीप बैनाडे, कृषी पर्यवेक्षक भुरे, इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी राजेश गायकवाड या वेळी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात भात व नाचणी या पिकांसाठी अनुक्रमे 45 हजार 500 व 20 हजार इतकी विमा संरक्षित रक्कम आहे, तर विमा हप्त्याची रक्कम 910 व 400 रुपये आहे. 31 जुलैअखेरीस विमा हप्त्याची रक्कम भरणा करून जास्तीत जास्त शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात येते. या वर्षी अॅण्ड्रॉइड मोबाइल अॅपद्वारे शेतकर्यांना स्वतः पीक विमा योजनेचा अर्ज भरता येणार आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँका आणि सीएससी केंद्रांमधून शेतकर्यांना विमा हप्त्याची रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …