Breaking News

‘एपीएमसी’त अँटीजेन चाचण्यांना सुरुवात

पनवेल : बातमीदार

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील संपूर्ण व्यवहार बंद ठेवणे शक्य नाही. त्यामुळे तेथून कोरोनाची साखळी वाढू नये, यासाठी आता बाजार समितीतही प्रतिजन चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आजवर 30 संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. यातील दोघांचा अहवाल सकारात्मक आला आहे.

पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘एपीएमसी’त शीघ्र प्रतिजन चाचणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली. धान्य बाजारातील व्यापारी भवन येथे हे चाचणी केंद्र सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, त्या ठिकाणी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने तसेच पावसामुळे दुपारी तीन वाजता कांदा-बटाटा बाजारातील मुख्यालयात ‘ई-नाम’ योजनेच्या प्रयोगशाळेत घेण्यात आली. पालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली, बेलापूर आणि तुर्भे येथील पाच, इलठणपाडा दिघा, नोसिल नाका, घणसोली, वाशीगाव जुहूगांव आणि कुकशेत अशा पालिकेच्या सहा नागरी आरोग्य केंद्रांत प्रतिजन चाचण्या घेण्यात येत आहेत.

याशिवाय सर्व 23 नागरी आरोग्य केंद्रांत ही सुरुवात करण्यात येत आहे. या 11 केंद्रांप्रमाणेच डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय सेक्टर 5 नेरुळ, नानेश हॉस्पिटल सेक्टर 8 ए बेलापूर, जयराज हॉस्पिटल सेक्टर 4 बेलापूर, वे टू हेल्थ डायग्नोसिस सेंटर सेक्टर-42 सीवूड, नेरुळ, एक्सेल लॅब सेक्टर-21 नेरुळ अशा पाच ठिकाणी या चाचण्या घेतल्या जात आहेत.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply