पेण : प्रतिनिधी – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्वैच्छिक रक्तदान सप्ताह निमित्ताने श्रमिक थळ सामाजिक संस्थेच्या वतीने पेण तालुक्यातील कळवे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्या श्रमिक मंडळींकडून गणपतीच्या मूर्ती तयार केल्या जातात त्यापैकी 77 कारागिरांनी या शिबिरात रक्तदान केले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आदी शासनाच्या सूचनांचे पालन करून हा उपक्रम राबविण्यात आला. यात महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी डॉ. संजय ठाकूर यांनी सामाजिक बांधिलकी जपून रुग्णसेवा दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
या शिबिरात जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने डॉ. दीपक गोसावी, हेमकांत सोनार, पूनम पाटील, प्रज्ञा पवार, महेश घाडगे, संकेत घरत आदींनी रक्त संकलनाचे काम केले.