मोहोपाडा : प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीतर्फे अनुसूचित जाती एससी प्रभागाचे प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येत असून सध्या रायगड जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रभागातील 59 जातीचे गाव निहाय सर्वेक्षण समता दूत करीत आहेत.
या समता दूताने जिल्ह्यातील पंधरापैकी सहा ग्रामपंचायतीला भेट देऊन गावातील सविस्तर माहिती घेतली. यामुळे अनुसूचित जाती प्रभागातील 59 जातींना विकासासाठी अधिक चांगल्या प्रकारे उपक्रम राबवणे शक्य होणार आहे. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून समता दूत आपले काम करत आहे. या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी, युपीएससी, स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाइन कोचिंग क्लासेससाठी रजिस्ट्रेशन करण्याचे मार्गदर्शन समता सैनिक दूत करीत आहेत. या वेळी या सर्व भागांमध्ये बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, मुख्य प्रकल्प संचालक प्रज्ञा वाघमारे, प्रकल्प अधिकारी सचिन नांदेडकर, समतादूत मनीषा कलके, वैशाली पेरवे,अमोल म्हात्रे, रश्मी भोईर, अनुजा पाटील, रागिनी साखरकर, राहुल जगताप, गायकवाड, सदानंद जाधव आदी कार्य करीत आहेत.