पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील लोणीवली येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 24) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. हा सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
विचुंबे येथे झालेल्या या पक्षप्रवेशात लोणीवली येथील रोहित पवार, मयूर धनावडे, रूपेश पवार, जगदीश धनावडे, अनिल धनावडे, रोशन पवार, पंढरीनाथ पवार, सुरेश पवार, आतिष येरुणकर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, भाजपचे युवामोर्चा तालुका अध्यक्ष भुपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या कल्पना ठाकूर, प्रतिभा भोईर, लीना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.