Breaking News

महावितरण कार्यालयात गर्दी; वीज बिलांमध्ये सूट देण्याची मागणी

नवी मुंबई : बातमीदार

कोरोनामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये महावितरणच्या माध्यमातून मीटर रिडींग न घेता सरासरी वीज बिले आकारण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम पारलेला होता. जुलै महिन्यात रिडींगनुसार आकारण्यात आलेली वीज बिले जास्त रकमेची असल्याने पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. चौकशीसाठी नागरिक महावितरणच्या कार्यालयात गर्दी करीत असून आवाढव्य आकारण्यात आलेल्या वीज बिलांमध्ये सूट मिळण्याची मागणी केली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घेण्यात आला होता. या काळात महावितरण कंपनीने मीटर रिडींग न घेता मागील वर्षी एप्रिल ते जून महिन्यांमध्ये वापरण्यात आलेल्या युनिटनुसार सरासरी वीज बिले नागरिकांना आकारली होती. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आलेल्या वीज बिलांच्या तुलनेत मार्च पासून आकारण्यात आलेल्या वीज बिलांमध्ये वाढ केल्याचे आढळल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती तसेच अनेक नागरिक आणि विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून वाढीव वीज बिलांविरोधात महावितरण कार्यालयांमध्ये निवेदने देण्यात आली होती. जुलै महिन्यात महावितरणच्या माध्यमातून मीटर रिडींग घेण्यात आले असून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना वीज बिले प्राप्त करून देण्यात आली आहेत.

मागील काही महिन्यात सरसकट पाठविण्यात आलेली वीज बिलांचा भरणा केला असताना देखील या महिन्यात रिडींगनुसार पाठविण्यात आलेल्या वीज बिलांची रक्कम जास्त असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला असून चौकशी करण्यासाठी महावितरणच्याच्या कार्यालयात गर्दी करीत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचे उत्पन्नाचे साधन बंद असून अनेकांना वेतन मिळालेले नाही त्यामुळे वीज बिले भरायची कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे. जुलैमहिन्यात आकारण्यात आलेल्या वीज बिलांवर सूट देण्याची मागणी नागरिक

करीत आहेत.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply