Breaking News

पेणमधील आंबेघर येथे पतीने पत्नीला भोसकले

पेण : प्रतिनिधी

पेणमधील आंबेघर येथे पती-पत्नीमध्ये वाद होऊन पतीने पत्नीच्या पोटात धारदार हत्यार खुपसल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी पत्नी गुरुवारी सकाळी 10 वाजता कामाकरिता जात असताना आंबेघर येथील मृदुंगधारा गेटच्या जवळ पतीने समोर येऊन पत्नीला शिवीगाळ व दमदाटी करून खाली पाडले आणि हातातील धारदार हत्यार तिच्या पोटात भोसकले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी आरोपी पतीविरोधात पेण पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 324, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, फौजदार पवार अधिक तपास करीत आहेत.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply