पनवेल : तालुक्यातील गाढी नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य आंब्रे व सारिका आंब्रे हे दाम्पत्य तीन दिवसांपूर्वी वाहून गेले होते. बुधवारी शोधमोहिमेत त्यांची दुचाकी सापडली. गुरुवारी (दि. 11) तिसर्या दिवशी आदित्य आंब्रे यांचा मृतदेह कामोठे जुई येथील खाडीत सापडला, तर महिलेचा रात्री उशीरा सापडला. 11 जुलै रोजी एनडीआरएफच्या जवानांना शांतीवन ते नेरे भागाच्या नदीमध्ये एक रेनकोट सापडला होता. हा रेनकोट मृत व्यक्तीचा आहे. त्यानंतर जुई खाडीत त्याचा मृतदेह सापडला. बॉर्डर सिक्युरिटी कल्याण ग्रुप, एनडीआरएफ पुणे, सिडको अग्निशमन दल, पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयामार्फत तिसर्या दिवशीही शोधमोहीम सुरू होती. गुरुवारी संध्याकाळपर्यंत या महिलेचा मृतदेह शोधण्यात यश आले.
Check Also
राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …