उरण ः वार्ताहर
उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची 10 जुलै रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे प्रशासन अधिकारी पदावर बदली झाली. उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी ही जागा रिक्त असल्याने त्या जागेवर मुख्याधिकारी संतोष माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष माळी यांनी गुरुवारी (दि. 30) पदभार स्वीकारला. त्या अनुषंगाने उरणचे आमदार महेश बालदी यांनी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी उरण नगर परिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक मेधा सेख, उरण तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष जसीम गॅस, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे संतोष ठाकूर, देवेंद्र घरत, समीर कुथे, विनायक कोळी, अप्पू कोळी आदी उपस्थित होते.