खोपोली : प्रतिनिधी – वृक्ष लागवड आणि संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी खोपोलीतील केएमसी महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा व शहरात रॅली काढण्यात आली होती.
वृक्ष लागवड मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांनीही सहभागी होऊन पुढाकार घ्यावा तसेच लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन व्हावे, यासाठी शनिवारी येथील केएमसी महाविद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला होता. त्यानंतर महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सदर पोस्टर्स घेऊन खोपोली शहरातून जनजागृती रॅली काढली होती. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. शीतल गायकवाड व सहयोगी प्राध्यापकांनी पुढाकार
घेतला होता.