Breaking News

स्व. संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना मदत केल्याबद्दल पत्रकारांनी मानले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त

माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनामुळे निधन झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याबद्दल पनवेलमधील पत्रकारांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रविवारी (दि. 13) भेट घेऊन त्यांचे आभार मानले तसेच या वेळी दिवंगत संतोष पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार यांचे कोरोना संसर्गात वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने निधन झाले. सतत हसतमुख आणि लोकांच्या मदतीला धावणार्‍या पवार यांच्या अकस्मात निधनाने जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पवार कुटुंबीयांसाठी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याबद्दल पनवेलमधील पत्रकार गणेश कोळी, कुणाल लोंढे, वैभव गायकर, नितीन देशमुख, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे, विजय पवार, अनिल कुरघोडे, छायाचित्रकार भालचंद्र जुमलेदार, सुमंत नलावडे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले. या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, संतोष पवार हा अतिशय चांगला पत्रकार होता. समाजाची प्रगती कशी होईल याचा विचार करणारा होता. त्याच्यामध्ये फार मोठे विचार होते, माणुसकी होती. सर्वांना तो भावणारा होता. आज कोरोनाने जगावर संकट आले. हे संकट भयंकर आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगाची दमछाक झाली आहे. या संकटाचा पत्रकारांनी स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घेऊन सामना केला पाहिजे.रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष विजय पवार यांनी संतोष पवार यांचे निघून जाणे हे सगळ्यांना धक्का देऊन गेले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पवार यांच्या कुटुंबाला जी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे त्याबद्दल आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. असेच सदैव पत्रकारांच्या पाठीशी राहा, असे सांगितले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply