Breaking News

उपजिल्हा रुग्णालयात होणार कोविडची चाचणी; रुग्णांना दिलासा

माणगाव ः प्रतिनिधी

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शासनाकडून रॅपिड अँटीजन किटची सुविधा उपलब्ध झाल्याने आता या ठिकाणी कोविड विषाणूची चाचणी होऊन रुग्णाचा अर्ध्या तासात अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी

प्रसारमाध्यमांना दिली.  रायगडात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून माणगाव तालुक्यात सातत्याने कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांची चिंता वाढली आहे. या रुग्णांच्या उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कोविड सेंटर असून येथे दक्षिण रायगडातील माणगाव, म्हसळा, रोहा, तळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर येथून रुग्ण दाखल केले जात आहेत. पूर्वी या ठिकाणी सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे असणार्‍यांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी जे. जे. रुग्णालय मुंबई येथे पाठविण्यात येत होते. त्यामुळे ते पाठविलेले अहवाल येण्यासाठी दोन-तीन दिवस लागत असत, मात्र आता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात कोविडची रॅपिड अँटीजनची चाचणी सुविधा उपलब्ध झाल्याने त्यामुळे आता येथील दाखल रुग्णांचा चाचणी अहवाल अर्ध्या तासात उपलब्ध होत असल्याचे डॉ. प्रदीप इंगोले यांनी सांगितले. ही रॅपिड किटची सुविधा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाल्यामुळे येथील रुग्णांना, नातेवाइकांना तसेच रुग्णालय प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply