Breaking News

पनवेल तालुक्यात 199 नवे कोरोनाग्रस्त

तिघांचा मृत्यू; 166 रुग्णांना डिस्चार्ज

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 3) कोरोनाचे 199 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 166  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 166 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 118 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 33 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 48 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात 166 नवीन रुग्ण आढळले.  पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर ओवे कॅम्प आणि प्रभासृष्टी सोसायटी मधील  व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  सोमवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 39 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1269 झाली आहे. कामोठेमध्ये 44  नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1468 झाली आहे. खारघरमध्ये 21 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 1369 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 34 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1212 झाली आहे. पनवेलमध्ये 19  नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 1327  झाली आहे. तळोजामध्ये नऊ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 431 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 7076  रुग्ण झाले असून 5507 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.83 टक्के आहे. 1399 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 170 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन 33 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये उलवे सात, सुकापुर पाच, उसर्ली खुर्द तीन, करंजाडे तीन, नेवाळी दोन, आदई दोन, तसेच विचुंबे, वारदोली, पळस्पे, गुळसुंदे, देवळोली, देवद, डेरवली, चिखले, चिंचवली- वावंजे, बेलवली आणि आपटे येथे प्रत्येकी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. करंजाडे येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 48 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्हची संख्या 2207 झाली असून 1804 जणांनी कोरोनावर मात केली असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाडमध्ये आढळले 27 पॉझिटिव्ह

महाड : महाड तालुक्यात सोमवारी नव्याने 27 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर नऊ जणांनी कोरोनावर मात केली आहे व नवेनगर येथील एकाचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये एमबायो कॉलनी सात, जरीमरी मंदिर काकरतळे तीन, बिरवाडी, सुतारआळी नवेनगर, करंजखोल, आदर्शनगर बिरवाडी, ढालकाठी, श्रीजीरेसीडेंसी प्रभातकॉलनी, बारसगाव पठार, दादली, खारवली बिरवाडी, लोअर तुडील, दहीवड, बाजारपेठ, श्रीराम अपार्टमेंट गोमुखेआळी, नांगलवाडी, लक्ष्मी कॉलनी, विरेश्वर कॉलनी, सरेकरआळी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

उरणमध्ये 13 जणांना लागण

उरण : उरण तालुक्यात सोमवारी 13 नवे रुग्ण आढळले, एक रुग्णाचा मृत्यू व नऊ रुग्ण बरे झाले आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी टाऊनशिप उरण तीन, केगाव रोड रानवड शाळेजवळ विनायक उरण, वशेणी हनुमान मंदिर जवळ, कोप्रोली एस टी स्टँड जवळ, बोरी पाखाडी गणपती मंदिर जवळ, बोकडवीरा गोविंद सुधा आळी, जेएनपीटी, द्रोणागिरी उरण, करंजा नवापाडा, टाकीगावं कृष्णा मंदिर जवळ, नागाव उरण येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. नागाव उरण येथे एक मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण संख्या 914 झाली आहे. त्यातील 707 बरे झाले आहे. फक्त 176 कोरोना पॉझिटीव्ह  रुग्ण उपचार घेत आहेत व आज पर्यंत 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

कर्जत तालुक्यात 12 नवे बाधित

कर्जत : कर्जत तालुक्यात सोमवारी 12 कोरोना रुग्ण आढळले आहे. आजपर्यंत तालुक्यात कोरोनाचे 551 रुग्ण सापडले असून 425 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये वंजारवाडी दोन, मुद्रे दोन, भिसेगाव दोन, कर्जत दोन, अवसरे, पोशीर, खाड्याचा पाडा, हुमगाव येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

नवी मुंबईत 319 नव्या रुग्णांची नोंद; 306 जण कोरोनामुक्त

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत सोमवारी 319 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर 306 जण कोरोनामुक्त झाले. नवी मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 16 हजार 426 तर बरे झालेल्यांची 11 हजार 161 झाली आहे. सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 434 झाली आहे.

सद्य स्थितीत नवी मुंबईत चार हजार 831 रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी दिवसभरात एक हजार 615 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून, एकूण  रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या 21 हजार 098 झाली आहे. तर एकूण आरटीपीसीएस टेस्ट केलेल्यांची संख्या 35 हजार 106 झाली असून कोविड टेस्ट केलेल्यांची एकूण संख्या 56 हजार 204 झाली आहे.  आढळलेल्या रुग्णांची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 49, नेरुळ 98, वाशी 26, तुर्भे 24, कोपरखैरणे 50, घणसोली 38, ऐरोली 28,  दिघा सहा इतके रुग्ण आढळले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply