खोपोली ः भारतीय जनता पार्टी खोपोली महिला आघाडीतर्फे खोपोली पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम तसेच कोरोना योद्धा (डॉक्टर, सफाई कामगार, केमिस्ट, सामाजिक संस्था) यांना प्रशस्तिपत्र देण्याचा कार्यक्रम सोमवारी (दि. 3) झाला. या वेळी उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई पाटील, खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, उपाध्यक्ष प्रमोद पिंगळे, गोपाळ बावस्कर, अनिल करणूक, खोपोली महिला अध्यक्ष शोभा काटे, स्वाती बीवरे, गीता मोहिते, सुमिता महर्षी, अश्विन अत्रे, युवा अध्यक्ष अजय इंगुलकर, संजय म्हात्रे, विनया परदेशी, साठे, सुरेखा गांधी आदी उपस्थित होते.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …