उरण : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उरण येथील केअर पॉईंट हॉस्पिटलला डेडिकेट कोविड सेंटर बनवण्याची मागणी उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनकडून आमदार महेश बालदी यांच्याकडे करण्यात आली आहे.
उरण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रुग्णांना उपचारासाठी पनवेल, नवी मुंबई येथे जावे लागते. परिणामी वेळ वाया जातो. ते लक्षात घेऊन उरण येथील केअर पॉईंट हॉस्पिटलला डेडिकेट कोविड सेंटर बनवावे, अशी मागणी उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आमदार महेश बालदी यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन देतेवेळी तहसीलदार अंधारे, मेडिकल असोसिएशनचे डॉ. सुरेश पाटील, डॉ. विकास मोरे, डॉ. ठाकरे आदी उपस्थित होते.
Check Also
विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर
उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …
RamPrahar – The Panvel Daily Paper