Breaking News

पनवेल तालुक्यात 208 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

पाच जणांचा मृत्यू; 172 रुग्ण कोरोनामुक्त

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 8) कोरोनाचे 208 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 172 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 156 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 121 रुग्ण बरे झाले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 52 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 51 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी

पाठवण्यात आले आहे.

महापालिका क्षेत्रात कामोठे येथील सेक्टर 6 ए शिवसागर सोसायटी, सेक्टर 25 सोल्केम सोसायटी, सेक्टर 6 माऊली अपार्टमेंट, खांदा कॉलनी सेक्टर 8 नवरत्न सोसायटी, कळंबोली सेक्टर 1 घरकुल सोसायटी अशा पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 40 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1469 झाली आहे. कामोठेमध्ये 43 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1661 झाली आहे. खारघरमध्ये 29 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 1507 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 25 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1373 झाली आहे. पनवेलमध्ये 14  नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 1398 झाली आहे. तळोजामध्ये पाच नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 465  झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 7873 रुग्ण झाले असून 6194 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 182 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.67 टक्के आहे. 1497 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

ग्रामीणमध्ये आढळलेल्या रुग्णांत उलवे 21, नेरे पाच,  आदई, भोकरपाडा-पोयंजे, डेरवली, शिरढोण, विचुंबे येथे प्रत्येकी तीन, आपटे दोन, आजिवली, बेलवली, चावणे, चिंचवण, केवाळे, कुंडेवहाळ, पळस्पे, उसर्ली खुर्द, देवद येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

उरणमध्ये कोरोनाचे नऊ नवे रुग्ण

उरण : उरण तालुक्यात शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह नऊ रुग्ण आढळले व 22 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये पाटील आळी बोरी, बोकडवीरा, रांजणपाडा, दिघोडे हुतात्मा स्मारकाजवळ, मोरा कोळीवाडा, श्रीयोग सोसायटी करंजा, ज्ञानेश्वर घरआळी धाकटी जुई, जेएनपीटी उरण, वेश्वी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 968 झाली आहे. त्यातील 821 बरे झाले आहे. फक्त 112 रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कर्जतमध्ये 11 नवीन कोरोनाबाधित

कर्जत : कर्जत तालुक्यात शनिवारी 11 नवीन रुग्ण सापडल्याने आत्तापर्यंत तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सहाशेच्या टप्प्यात म्हणजे 593 वर गेली आहे. तर आतापर्यंत 495 रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये महावीर पेठेत दोन, वदप गावात दोन, म्हाडा वसाहत, जैन हॉस्पिटलच्या शेजारील इमारतीत, गुंडगे येथील मातेश्वरी हिल इमारत, मुद्रे भागातील नानामास्तर नगर, नेवळी मधील कार्तिक इमारत, मुळगाव, कर्जत येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

महाड तालुक्यात 24 जणांना लागण

महाड : महाडमध्ये शनिवारी कोरोनाचे 24 नवे रुग्ण आढळून आले असुन, 34 जनांनी कोरोनावर मात केली आहे. तर जेष्ठ आयकर विधीज्ञ कांतीलाल गुजर यांचे निधन झाले. आढळलेल्या रुग्णांत प्रभातकॉलनी, वरंध, कोटेश्वरीतळे, मनोरमा अपार्टमेंट कोटेश्वरीतळे, बापटनगर बिरवाडी येथे प्रत्येकी दोन, पिडीलाईट कॉलनी, महाड, नरसिंह अपार्टमेंट गोमुखेआळी, तालुका पोलीस ठाणे, पलंगेगल्ली नवीपेठ, बिरवाडी, चांभारखिंड, तांबटभुवन, नातेखिंड, करंजखोल, चंद्रपुष्पा, गुजराती हॉल शेजारी, घरलआळी, चांढवे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply