Breaking News

कृष्णा कोबनाक यांची सदस्यपदी नियुक्ती

माणगाव ः प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे म्हसळा तालुक्यातील शिवाजीनगर चाफेवाडी गावचे क्रियाशील कार्यकर्ते कृष्णा कोबनाक यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणी समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी कृष्णा कोबनाक यांची प्रदेश कार्यकारिणीवर शिफारस केली होती. त्यानुसार कृष्णा कोबनाक यांची प्रदेश समितीवर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

कृष्णा कोबनाक यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे. रायगड जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी चार वर्षे काम केले. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कृष्णा कोबनाक यांनी भाजपत प्रवेश केला. त्यांना त्या वेळी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत कोबनाक यांनी जवळपास 15 हजार इतके मतदान आपल्या लोकप्रियतेवर घेतले होते.त्यांनी जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याच्या इराद्याने भाजपचे जोमाने काम केले. कोबनाक यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करताना भाजपच्या कल्याणकारी योजनांचा लाभ गोरगरीब जनतेला मिळवून दिला.

पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक राहत त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी समितीवर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. कोबनाक यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती झाल्याने त्यांचे भाजप रायगड जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा महिला मोर्चा पदाधिकारी, श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी हेमा मानकर

माणगाव ः प्रतिनिधी

पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी भाजपच्या रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी तळा तालुक्यातील महागावच्या पक्षाच्या क्रियाशील कार्यकर्त्या हेमा मानकर यांची नियुक्ती नुकतीच जाहीर केली. हेमा मानकर तळा व माणगावात सक्रियपणे काम करीत आहेत. तळा तालुका भाजप महिला मोर्चा अध्यक्ष, रायगड जिल्हा अन्नधान्य नागरी पुरवठा समितीवर तसेच तळा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीवर सदस्य म्हणून हेमा मानकर यांनी काम केले आहे.

त्यांनी पक्षाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत गरिबांना उज्ज्वला गॅस कनेक्शन तसेच निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला. कोरोनाच्या संकटात त्यांनी गरीब, मध्यमवर्गीय 500 लोकांना स्वखर्चाने अन्नधान्याच्या किटचे वाटप केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हेमा मानकर यांची भाजपच्या रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेमा मानकर यांची भाजप रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, जिल्हा भाजप सरचिटणीस सतीश धारप, मिलिंद पाटील, राजेश मपारा, माणगाव भाजप तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे, जिल्हा महिला मोर्चाच्या प्राजक्ता शुक्ला, महिला मोर्चा माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे, माणगाव शहर महिला मोर्चा अध्यक्ष दीपाली जाधव, अश्विनी यादव, अश्विनी खरे यांच्यासह माणगाव व तळा येथील भाजपचे पदाधिकारी व सदस्य तसेच महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply