Breaking News

न्हावा-शेवा बंदरात मोठी कारवाई; तब्बल एक हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

उरण : वार्ताहर
न्हावा-शेवा बंदरातील एका कंटनेरमधून 191 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत एक हजार कोटी रुपये आहे. सीमा शुल्क विभाग व महसुल गुप्त वार्ता संचलनालयाने (डीआरआय) यांनी संयुक्तरित्या ही कारवाई करून दोघांना अटक केली आहे. अफगाणिस्तानातून हे ड्रग्ज आलेले असून, यामागे मोठे रॅकेट असल्याचे म्हटले जात आहे.
न्हावा शेवा बंदरात परदेशातून ड्रग्सचा मोठा साठा येणार असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार डीआरआय व सीमा शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने बंदरात शोधमोहीम राबवून रविवारी (दि. 9) संशयित कंटेनर शोधून काढला. आयुर्वेदिक मुलेठीच्या नावाखाली त्यातून हेरॉईन लपवून आणण्यात आले होते. त्याशिवाय काही ड्रग्सचा साठा पाईपमध्येही लवपण्यात आला होता.
या प्रकरणी कंटेनरशी संबंधित दोन व्यक्तींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याच्याशी आंतरराष्ट्रीय तस्करांची टोळी संबंधित असून, हा सर्व साठा मुंबई व गोव्यामध्ये जाणार असल्याचा संशय आहे. अलिकडच्या काळातील अमली पदार्थ जप्तीची ही मोठी कारवाई आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply