Breaking News

फिरत्या चाचणी सुविधेला प्रारंभ; ‘मिशन झीरो’अंतर्गत रुग्णांचा शोध; 40 वाहने सज्ज

पनवेल ः बातमीदार

नवी मुंबई शहरात ‘मिशन झीरो’अंतर्गत रुग्णांचा तातडीने शोध घेण्यासाठी पालिकेच्या वतीने भर दिला जात आहे. यासाठी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून गृहसंस्था आणि वसाहतींमध्ये फिरती चाचणी सुविधा करण्यात आली आहे. यात प्रतिजन चाचण्या केल्या जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत कोरोनावर मात करण्यासाठी ‘मिशन झीरो’ मोहीम सुरू करण्यात आली आहे.

शहरात रुग्ण आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि त्यांचे विलगीकरण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने अर्ध्या तासात तपासणी अहवाल प्राप्त होणार्‍या प्रतिजन चाचण्यांवर भर दिला आहे. शहरात जवळजवळ 25 प्रतिजन चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. कोरोनाविषयक जागृतीसाठी सहा प्रचाररथ तयार करण्यात आले आहेत. त्यावर जिंगल्स, संवाद, निवेदन या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे, तर दुसर्‍या ठिकाणी तेथे प्रतिजन चाचण्या करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने शहरातील ज्येष्ठ नागरिकांबरोबरच  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार असणार्‍या नागरिकांच्या चाचण्या करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासोबतच कोरोनाची खोकला, ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या प्रतिजन चाचण्या करण्यात येणार आहेत. सोसायटी, वसाहतीमार्फत प्रतिजन टेस्ट करावयाची मागणी झाल्यास त्या ठिकाणीही ’ऑन कॉल प्रतिजन चाचणी सुविधा’ उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सध्या 40 वाहने सज्ज करण्यात आली आहेत. 34 गाड्यांच्या मदतीने चाचण्या करण्यात येतील, तर सहा मोबाइल व्हॅन कोरोनाच्या चाचणीसाठी प्रचार करतील, असे नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply