Breaking News

पनवेल मनपा उपमहापौर, सभापती निवडणुकीसाठी भाजपचे अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती आणि प्रभाग समित्यांच्या सभापतीसाठी मंगळवारी (दि. 11) निवडणूक होणार आहे. उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या, तसेच स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती आणि प्रभाग समितीच्या जागांसाठी सोमवारी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल झाले.
या निवडणुकीत उपमहापौरपदासाठी भाजपकडून नगरसेविका सीताताई पाटील, स्थायी समिती सभापतीसाठी नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापतीसाठी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, तसेच प्रभाग समिती ‘अ’साठी नगरसेविका संजना कदम, ‘ब’साठी नगरसेविका प्रमिला पाटील, ‘क’साठी नगरसेविका अरुणा भगत, तर ‘ड’साठी नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज महापालिकेचे सचिव तिलकराज खापर्डे आणि दशरथ भंडारी यांच्याकडे महापालिकेत दाखल केला. महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व पाहता या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी होणार हे स्पष्ट असून औपचारिकता बाकी आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply