Breaking News

जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिकारकांना मानवंदना

पनवेल ः वार्ताहर

सर्वत्र 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. रॅली, मिरवणूक, सभा, आंदोलन, मोर्चे, उपोषण यांसारखे अनेक उपक्रम या दिवशी आखले जातात, मात्र या वर्षी कोरोनाचे महासंकट व लॉकडाऊनमुळे सर्व ठिकाणी शासनाचे नियम पाळून आदिवासी कार्यकर्त्यांनी जागतिक आदिवासी दिन साध्या पध्दतीने साजरा केला. या वेळी क्रांतिकारकांना मानवंदना देण्यात आली.

पनवेल तालुक्यात धोदाणी, मालडुंगे परिसरात काही वर्षांपूर्वी आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून हुतात्मा नाग्या महादू कातकरी चौक असे नामकरण करण्यात आले. या हुतात्मा नाग्या कातकरी चौकाजवळ आदिवासी क्रांतिकारकांना मानवंदना देण्यासाठी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते एकत्र येऊन हुतात्मा नाग्या कातकरी व क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले, तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, हुतात्मा नाग्या कातकरी, क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्यासह अन्य क्रांतिकारकांना मानवंदना देण्यात आली. तसेच कोरोनाशी लढा व लॉकडाऊनमध्ये विविध क्षेत्रांत कार्यरत व्यक्तींची दखल घेऊन जागतिक आदिवासी दिनानिमित्त समाज चळवळीचे वृत्तपत्र साप्ता. आदिवासी सम्राट तसेच आदिवासी न्यूज अ‍ॅण्ड इंटरटेन्मेट यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोरोना योद्धा पुरस्कार, सन्मानपत्र संपादक, अध्यक्ष गणपत वारगडा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी मालडुंगे ग्रामपंचायत सरपंच हर्षदा चौधरी, सदस्य जनार्दन निरगुडा, ज्येष्ठ कार्यकर्ते सी. के. वाक, इंजि. उत्तम डोके, राजिप शिक्षक सोमनाथ चौधरी, चंद्रकांत सांबरी, मा. उपसरपंच काळूराम वाघ, मैद्या चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सीताराम चौधरी, जनार्दन घुटे, गणपत हिरवे, बबन हिरवे, सीताराम वारगडा, पोलीस पाटील नारायण चौधरी, कोतवाल अर्जुन घुटे, सेवा संघाचे उपाध्यक्ष राम भस्मा, सचिव सुनील वारगडा, संजय चौधरी, गणेश साहू, कमळू चौधरी, किसन चौधरी, गणपत चौधरी आदी उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply