Breaking News

स्नेहलता साठे यांचे निधन

ठाणे ः प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायणराव सावरकर यांच्या कन्या स्नेहलता सदाशिव साठे यांचे ठाणे येथे कर्करोगाने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे, चित्रा मसलेकर या कन्या व मुलगा इंद्रजित साठे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चपला हे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव. चपलाआत्या म्हणून त्या सर्वांना परिचित होत्या. सावरकर घराण्यातील व त्यांच्या विचारांचे प्रेरणादायी तसेच कृतिशील व्यक्तिमत्त्व गमावल्याने सावरकरप्रेमींवर शोककळा पसरली आहे.

स्नेहलता साठे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतणी होत्या, मात्र त्यांनी ही ओळख कधीच दाखविली नाही. स्नेहलता साठे यांनी सावरकर विचारांच्या प्रसार-प्रचारासाठी आयुष्यभर कार्य केले. 8 एप्रिल 1937 रोजी जन्मलेल्या चपला यांचे बालपण वडील नारायण सावरकर, काका बाबाराव आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सहवासात गेले. या वारशाचा परिणाम त्यांच्यावर आयुष्यभर होता. स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या त्या सक्रिय सदस्य होत्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply