Breaking News

चाकरमान्यांसाठी नियमावली जाहीर

पाली ः प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवात चाकरमान्यांनी पाली-सुधागडात येण्याची तयारी दर्शविली आहे. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानिमित्त पालीत येणार्‍या चाकरमान्यांसाठी ग्रुप ग्रामपंचायत पाली व कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीने नियमावली जाहीर केली आहे.

गणेशोत्सवाकरिता गावी येणार असाल तर गावाकडे येऊन 10 दिवसांकरिता होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक आहे. गावाकडे होम क्वारंटाइन काळात शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. संसर्गाचा धोका लक्षात घेता पूर्वकल्पना देत आहोत. आपल्या गावातील लहान मुले व वृद्ध नागरिकांच्या काळजीपोटी हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. आपल्या गावी राहणार्‍या कुटुंबांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी आपण दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. शासनाने यात काही बदल केल्यास हे नियम शिथिल होऊ शकतात. चाकरमान्यांनी गाव कोरोनामुक्त राहावे यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पाली ग्रामपंचायत सरपंच गणेश बाळके तथा अध्यक्ष कोरोना सनियंत्रण व दक्षता समिती यांनी केले आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply