Breaking News

राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून भोसले कुटुंबीयांचे सांत्वन

महाड ः प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष राजेय भोसले यांच्या निधनानंतर विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी महाड येथे त्यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले. महाड भाजपचे उपजिल्हाध्यक्ष राजेय भोसले हे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांचे विश्वासू निकटवर्तीय होते. रविवारी (दि. 2) मुंबई येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटमध्ये कोरोनावर उपचार घेताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या दशक्रिया आणि उत्तरकार्यदिनी आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून मी खंबीरपणे तुमच्या पाठीमागे असल्याचा आधार या कुटुंबाला दिला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, बिपीन महामुणकर, जयवंत दळवी आदी उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply