पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील धीरज शाम साळुंखे या जवानाचा बुधवारी (दि. 1) दिल्ली येथे लष्करी इस्पितळात तर सचिन चिकणे या जवानाचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. धीरज यांच्या पार्थिवावर लोहारे (ता. पोलादपूर) येथे गुरूवारी (दि. 2) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी दोन्ही जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
दिल्ली येथील लष्करीतळामध्ये जवान धीरज साळुंखे आणि सचिन चिकणे (कुडपण, ता. पोलादपूर) यांना लष्करी इतमामात सलामी देण्यात आल्यानंतर धीरज यांचे पार्थिव मुंबईला रवाना झाले. मुंबईमध्येही साळुंखे यांना सलामी देण्यात येऊन पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. जवान सचिन चिकणे याचे पार्थिव पुणे येथे नातेवाईकांकडे रवाना करण्यात आले.
पोलादपूर येथे जवान धीरज यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी तहसीलदार दिप्ती देसाई, निवासी नायब तहसीलदार समीर देसाई, एपीआय प्रशांत जाधव, माजी उपसभापती संभाजी साळुंखे, रघुनाथ वाडकर, नामदेव उतेकर, जि. प. सदस्य चंद्रकांत कळंबे, जाधव आदी उपस्थित होते. या वेळी जवान सचिन चिकणे यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
Check Also
पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper