भाजप रोहा तालुका युवा मोर्चाची मागणी

रेवदंडा : प्रतिनिधी
रेवदंडा-रोहा रस्त्यातील खड्डे आठ दिवसांत चांगल्या मटेरियलने भरून द्यावेत, असे निवेदन रोहा तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम खात्यास भाजपचे रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सुदर्शन गावडे यांनी दिले.
रोहा-रेवदंडा रस्त्यावर चणेरा साळाव जेएसडब्लू कंपनीच्या अवजड वाहतुकीने रस्त्याची दुरवस्था झाली असून पारंगखारे चणेरा या मुख्य रस्त्यावर तर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागताच रेवदंडा-रोहा रस्त्यावरील खड्डाची डागडूजी सुरू करण्यात आली आहे, या रस्त्त्यावर मलममपट्टीचे काम सुरू आहे. मात्र आज भरलेले खड्डे पुनस्यः दुसर्या दिवशी जैसे थे, होत आहेत. परिणामी येथील स्थानिक ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. या रस्त्याने जा-ये करणे जिकीरीचे बनले असून वाहने वाहतुकीस सुध्दा समस्येचे बनले आहे. या रस्त्याने साळाव येथील जेएसडब्लू कंपनीचे अवजड मालवाहतूक सुरू असते. त्यामुळे साध्या पध्दतीने भरलेले खड्डे टिकाव धरू शकत नाही, गणेश उत्सव आठ दिवसांवर आला असून येत्या आठ दिवसांत हे खड्डे पुनस्यः चांगल्या मटेरियलने भरून दयावेत तसेच साळाव जेएसडब्लू कंपनीची अवजड मालवाहतुक रेवदंडा-साळाव पुल अवजड वाहतुकीस बंद केल्याने रोहा मार्गे सुरू असून या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे.
या रस्त्यावरील अजवड वाहतुकीने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यास योग्य ते आदेश देऊन रस्त्याची खड्डे भरणे, व डागडूजी लवकरात लवकर करावे, अन्यथा स्थानिक साळाव जेएसडब्लू व प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाच्या मानसिकतेत आहेत, असे निवेदन भाजप युवा मोर्चाचे रोहा तालुका अध्यक्ष सुदर्शन गावडे यांनी रोहा तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम खाते यांना दिले आहे.