Breaking News

कोट्यवधींच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी आता ‘ईडी’ करणार चौकशी

पनवेल : रामप्रहर वृत्त

कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार व बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या माध्यमातून कर्नाळा बँक कार्यरत आहे. या बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी ईडी चौकशी करणार असल्याने विवेक पाटील यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे.

कर्नाळा बँकेत 650 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आल्या. ठेवीदारांना व खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत यासाठी पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी खातेदार व ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहचविला. वेळप्रसंगी बँकेच्या विरोधात ठेवीदारांच्या साथीने आंदोलनही केले होते. आता कर्नाळा बँक घोटाळासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी आपले म्हणणे ईडीच्या कार्यालयात जाऊन मांडले असून, पुरावेही सादर केल्याची माहिती पुढे येत आहे. ईडीच्या चौकशीमुळे कर्नाळा बँक व शेकापचे नेते, माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर आता ईडीची टांगती तलवार असणार आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply