पनवेल : रामप्रहर वृत्त
पोलीस मित्र संघटनेच्या पनवेल तालुका उपाध्यक्षपदी रसायनी येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश बाळाराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश पाटील रसायनी विभागातील कासप गावचे रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात सातत्याने सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांनी योगेश पाटील यांची पनवेल तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे. पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून योगेश पाटील हे पोलीस व नागरिकांना मदत करीत राहतील, असा विश्वासही चौधरी यांनी व्यक्त केला आहे.