पाली ः प्रतिनिधी
जागतिक आदिवासी दिनानिमित्त अन्नदा संस्थेकडून नुकतेच सुधागड तालुक्यातील पावसाळा व दांड आदिवासीवाडीवर धान्याच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. याचा लाभ 900 आदिवासींना मिळाला. जागतिक आदिवासी दिन पालीसह सबंध तालुक्यात विविध लोकोपयोगी व समाजाभिमुख उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. कोरोनाच्या महामारीत आदिवासी बांधवांना आपुलकीची साथ व मदतीचा हात देत अन्नदा संस्थेने तब्बल 900 आदिवासींना धान्य पाकिटांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
कुपोषणमुक्त भारत हा अन्नदा संस्थेचा मूळ हेतू असून त्या दृष्टीने संस्था काम करीत आहे. या वेळी सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र पाटील, उमेश खेरटकर, बबन शिंदे, कोंडू शिंदे, एकनाथ पवार आदी मान्यवर आणि आदिवासी बांधव उपस्थित होते.