Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

पनवेल : रामप्रहर वृत्त
अफाट लोकप्रियता असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 72वा वाढदिवस शुक्रवारी (दि. 2) विविध उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह हितचिंतक नागरिकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.
सर्वसामान्यांचा आधारस्तंभ असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच समाजातील प्रत्येक घटकासाठी मदतीचा हात दिला आहे. वाढदिवसाचे निमित्त असले तरी वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून दानशूर व लाडके नेते लोकनेते रामशेठ ठाकूर सुपरिचित आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय तसेच क्रीडा स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.
समाजकारणाचे भान ठेवून काम करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा राजकारण हा मूळ पिंड नसून समाजकारण हाच त्यांचा गाभा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सातत्याने समाजसेवेचे व्रत सुरूच आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभीष्टचिंतनाला उत्तर देताना सर्वांचे आभार मानले तसेच हे प्रेम कायम राहू द्या, अशी भावना व्यक्त केली.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply