11 जणांचा मृत्यू; 329 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 13) कोरोनाचे 211 नवीन रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 329 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 157 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 287 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 54 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 42 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल मधील सेक्टर 17 पीएल -6 , सेक्टर 3 जे.बी .सोसायटी, खांदा कॉलनी सेक्टर 9 पी.एल. 5, सेक्टर 12 गंगोत्रि सदन, कामोठे सेक्टर 20 कुसुम कुंज, सेक्टर 14 पावणेकर आळी, सेक्टर 11 अमरव्हिला, सेक्टर 10 ओम साईनाथ सोसायटी, सेक्टर 34 मानसरोवर बिल्डिंग आणि तळोजा फेज -2 टी.पी.एस तारा बिल्डिंग मधील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 29, कामोठेमध्ये 30, खारघरमध्ये 32, नवीन पनवेलमध्ये 25, पनवेलमध्ये, तळोजामध्ये आठ नवीन रुग्ण आढळले आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 8773 रुग्ण झाले असून 7051 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 8037 टक्के आहे. 1507 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 215 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये न्हावा नऊ, सुकूपर आठ, करंजाडे सात, उलवे सहा, कुंडेवहाळ व विचुंबे प्रत्येकी चार, डेरवली व उसर्ली खुर्द प्रत्येकी तीन, पळस्पे व देवद प्रत्येकी दोन, आदई, आकुर्ली, मानघर, मोहो, पारगाव, तरघर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर उलवे येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत पॉझिटिव्हची संख्या 2598 झाली असून 2177 जणांनी कोरोंनावर मात केली असून 54 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत 317 जणांना संसर्ग
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत गुरुवारी 317 जणांचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला तर 283 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 19 हजार 757 तर बरे झालेल्यांची 15 हजार 768 झाली आहे. गुरुवारी सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 493 झाली आहे. दिवसभरात तीन हजार 481 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून, एकूण रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या 44 हजार 323 झाली आहे. तर एकूण आरटीपीसीआर टेस्ट केलेल्यांची संख्या 38 हजार 061 झाली असून कोविड टेस्ट केलेल्यांची एकूण संख्या 82 हजार 384 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 41, नेरुळ 49 वाशी 36, तुर्भे 46,कोपरखैरणे 56, घणसोली 31, ऐरोली 54 दिघा 4 यांचा समावेश आहे.
उरण तालुक्यात 36 नवीन पॉझिटिव्ह; चार रुग्णांचा मृत्यू
उरण : वार्ताहर – उरण तालुक्यात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह 36 रुग्ण आढळले, चार रुग्णांचा मृत्यू व 16 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी टाऊनशिप सहा, दिघोडे तीन, जासई तीन, श्री समर्थ अपार्टमेंट दोन, चिरनेर, नवापाडा विंधणे, खोपटा, रांजणपाडा, जेएनपीटी पोर्ट, करळ, धुतुम, किर्तन अपार्टमेंट डाऊरनगर, पिरवाडी, करंजा, धुतुम, नागाव, साई मंदिरजवळ डाऊरनगर, बोकडवीरा, कोप्रोली, नवघर, हरी पांडवपथ, कंठवली, धुतुम, नवीन शेवा, भेंडखळ, बोकडवीरा गोविंद सुधा आळी साई बाबा मंदिरजवळ येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर भेंडखळ, बोकडवीरा, कोंढरीपाडा करंजा व फुंडे सिंडीकेट बँक जवळ येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1075 झाली आहे. त्यातील 863 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 164 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रोहा तालुक्यात 25 नवे बाधित
रोहे : प्रतिनिधी – रोहा तालुक्यात गुरुवारी 25 कोरोना बाधित व्यक्ती आढळले असून 19 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांत शहरात सात तर ग्रामीण भागामध्ये 18 व्यक्ती आढळल्या आहेत. यामध्ये पाच स्त्रियांचा व 20 पुरुषांचा समावेश आहे. तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 883 वर पोहचली आहे. तर मात करणार्या व्यक्तींची संख्या 596 वर पोहचली आहे. आतापर्यंत 20 व्यक्तींना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. रोहा तालुक्यात आत्ता 267 कोरोना सक्रिय बाधित व्यक्ती असून ते विविध ठिकाणी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कर्जतमध्ये 10 नव्या रुग्णांची नोंद
कर्जत : कर्जत तालुक्यात गुरुवारी नवीन दहा रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत कर्जत तालुक्यात 634 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 538 रुग्ण उपचारांनंतर घरी आले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये महावीर पेठेत दोन, दहिवली सुयोग नगर, आंबिवली, दहिवली, नेरळ, किरवली – देऊळवाडी नजीकच्या बामणोल, मुद्रे भागातील नेमिनाथ सोसायटी, नानामास्तर नगर, तळवली येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.