Breaking News

पनवेल तालुक्यात 193 नवीन रुग्ण

सात जणांचा मृत्यू; 195 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी  – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 15) कोरोनाचे 193 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 195  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 132 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 161 रुग्ण बरे झाले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 61 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 34 रुग्ण बरे झाले आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल रिध्दी सिध्दी अपार्टमेन्ट, नवीन पनवेल सेक्टर 14, कामोठे सेक्टर 16 प्रत्येकी एक अशा तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांत पनवेल 27, नवीन पनवेल 25, खांदा कॉलनी एक, कळंबोली 15, कामोठे 33, खारघर 21, तळोजे  10 असे नवीन रुग्ण आढळले आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 9035 रुग्ण झाले असून 7334 रुग्ण बरे झाले आहेत. 1472 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 229 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये सुकापूर 12, करंजाडे नऊ, उलवे आठ, आदई, पळस्पे, पालीदेवद येथे प्रत्येकी पाच, कुंडेवहाळ, कोळखेपेठ, मोहो, नेरे, शेडुंग, शिरवली प्रत्येकी दोन, आकुर्ली, आजीवली, कोळखे, पोयंजे, साई प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर सुकूपर येथील तीन व पळस्पे येथे एका रुग्णाचा मृत्यूचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला.

उरण तालुक्यात 31 नवे रुग्ण

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – उरण तालुक्यात शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह 31 रुग्ण आढळले व 18 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये केगाव बांधीवाडी तीन, मदन गौरी निवास ओमकार कॉलनी कुंभारवाडा दोन, ओमकार कॉलनी दोन, वर्तक आळी गोवाठणे, साई विनंती सोसा नागाव, डोंगरी, आंबे नगर सजन अपा नागाव, रानवड केगाव, नागाव, मुळेखंड, द्रोणागिरी, एकटघर जासई, ग्राइंडवेल कॉलनी, धुतुम, डाऊरनगर साई बाबा मंदिर जवळ, नागाव, चारफाटा, रांजणपाडा, जेएनपीटी, विनायक काठेआळी केगाव, कोळीवाडा उरण, पाटील आळी बोरी, जेएनपीटी, बोरी, बोरखार, दत्त मंदिर मोरा उरण, कोळीवाडा येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1148  झाली आहे. त्यातील 894  बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 205 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आज पर्यंत 49 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

कर्जतमध्ये सात नवीन पॉझिटिव्ह

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार – कर्जत तालुक्यात शनिवारी नवीन सात रुग्ण आढळले असून आजपर्यंत तालुक्यात 659 रुग्ण संख्या झाली आहे तर 554 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र शुक्रवारी तीन आणि शनिवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 25 वर गेली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन नजीकच्या चिंचवली गावात, नेरळ नजीकच्या धामोते, तळवली, दहिवली कॉलेज रस्ता, मुद्रे भागातील वास्तू अपार्टमेंटमध्ये, मुद्रे बुद्रुक, दहिवली येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

महाडमध्ये 33 नव्या रुग्णांची नोंद

महाड : प्रतिनिधी – महाड तालुक्यात शनिवारी कोरोनाचे 33 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 23 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये अ‍ॅक्वाफार्मा कॉलनी 13, मोहोप्रे चार, बिरवाडी दोन, देशमुख मोहल्ला, एमजी रोड, माधवाश्रम, आदर्शनगर बिरवाडी, पितृसंपदा रोहीदासनगर, कोटेश्वरीतळे मनोरमा बिल्डींग, धरणाची वाडी वरंध, मधली आळी सुंदर टॉकीज, नातकुंजबिल्डींग रोहीदास नगर, दादली- चोचिंदे, काळीज, तांबडभुवन, कोटेश्वरीतळे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. महाडमध्ये एकुण 178 रुग्ण उपचार घेत असुन, 500 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात आता पर्यंत 710 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply