मुंबई ः भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 15 ऑगस्टच्या दिवशीच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आतापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत. 2019च्या विश्वचषकात भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन निवड समितीने धोनीला नंतर स्थान दिले नाही. संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ खेळी चर्चेत होती. 2019च्या विश्वचषकानंतरच धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार होता, परंतु विराट कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलायला सांगितले होते.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …