Breaking News

अपहृत चार अल्पवयीन मुलींचा शोध; दोन तरुण ताब्यात

पनवेल ः बातमीदार

नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने नवी मुंबईच्या विविध भागांतून अपहरण झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे. या कारवाईत अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्‍या दोन तरुणांनादेखील ताब्यात घेतले आहे.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबईच्या हद्दीतून अपहृत मुलामुलींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने

पाच-सहा महिन्यांमध्ये अपहरण झालेल्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला होता. या तपासात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पळवून नेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला शिवम कृष्णा गौड (19) या तरुणाने पळवून नेल्याचे, तसेच मुलीला कल्याणमधील पिसवली गाव येथे ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पिसवली गावातून अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला पळवून नेणार्‍या शिवम गौडा याला ताब्यात घेतले.

त्याचप्रमाणे रबाळे एमआयडीसीतील आणखी एका अल्पवयीन मुलीला अजय प्रेमसिंग राज याने पळवून नेऊन औरंगाबाद येथील वाळुंज एमआयडीसी परिसरात ठेवल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्या ठिकाणावरून मुलीची सुटका करून अजय राज याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही मुलींना व त्यांना पळवून नेणार्‍या तरुणांना पुढील कारवाईसाठी रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या कारवाईप्रमाणेच नेरूळ परिसरातून अपहरण झालेल्या व कळंबोली भागातून अपहरण झालेल्या दोन मुलींचादेखील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शोध घेतला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply