Saturday , June 3 2023
Breaking News

विवाहितेची आत्महत्या

जेएनपीटी ः वार्ताहर

उरण चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील श्रीयोगनगर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणार्‍या स्नेहल म्हात्रे (28) या विवाहित महिलेने छताच्या पंख्याला स्वत:ची ओढणी अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. 26) घडली. या घटनेसंदर्भात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरण तालुक्यातील बोकडवीरा गावात राहणार्‍या स्नेहलचे लग्न खोपटा गावातील विक्रांत म्हात्रे या तरुणासोबत काही वर्षांपूर्वी झाले होते. या दाम्पत्यास एक मुलगा असून लग्नानंतर हे दाम्पत्य उरण चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील श्रीयोगनगर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहण्यासाठी आले होते. रविवारी (दि. 24) हे दाम्पत्य आपल्या बांधपाडा (खोपटा) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपल्या गावातील घरीही जाऊन आले होते. मंगळवारी विक्रांत म्हात्रे कामावर गेल्यानंतर स्नेहलने रूममध्ये जाऊन दरवाजाची कडी लावून घेतली. स्नेहलच्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावून गेले असता स्नेहलने छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती स्नेहलचे नातेवाईक व उरण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन स्नेहलचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेसंदर्भात उरण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply