Breaking News

माथेरान जंगलात वणवा

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लहानग्यांचा पुढाकार

कर्जत : बातमीदार : माथेरान पंचशील नगर परिसरातील जंगलाला सोमवारी (दि. 25) रात्री लागलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी येथील नागरिकांसह लहान मुलांनी पुढाकार घेऊन, शेकडो झाडे आगीच्या विळख्यात येण्यापासून वाचवली आहेत. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास माथेरानच्या पंचशील नगर येथील जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली. या वेळी परिसरातील रहिवासी, तसेच खेळत असलेल्या लहान मुलांनी आगीचा डोंब पाहून घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी अग्निशमन दलाचे वाहन जाण्यास योग्य रस्ता नाही, मात्र आजूबाजूची घरे, तसेच मोठमोठ्या झाडांना या वणव्यापासून वाचविण्यासाठी येथील रहिवासी, तसेच बच्चे कंपनीने प्रसंगावधान राखून घरातील पाण्याच्या बादल्या, ड्रम यांच्या सहाय्याने पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवले. या वेळी जनार्दन आखाडे, शबाब कुरेशी, सह्याद्री मित्र रेस्क्यु टीमचे सुनील कोळी, तसेच ऋषिकेश सोनावणे, संकेत रॉड्रिक्स, मयुरेश हातोळे, आदित्य बनसोडे, फैसल शेख, राहुल हातोळे, रोहन गायकवाड, रोहित कोळी, नरेश सोनावणे या मुलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत शेकडो झाडे आगीपासून वाचवली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply