Breaking News

अखेर ‘तो‘ सडलेला विजेचा खांब कोसळला

कर्जत : प्रतिनिधी : कर्जत नगर परिषद हद्दीतील विठ्ठलनगर परिसरातील सडलेला विजेचा खांब अखेर मंगळवारी (दि. 26) कोसळला. त्यामुळे पुन्हा एकदा वीजवितरण कंपनीचा गलथान कारभार समोर आला आहे. वीजवितरण कंपनीचे कर्जत शहरातील अनेक खांब मुळाशी सडले आहेत. हे खांब फक्त वरील वीजवाहिन्यांच्या आधारावर उभे आहेत. काही खांब रस्त्याच्या बाजूला आहेत, तर काही खांब गटारात उभे आहेत. ते खांब कधीही पडून अपघात होऊ शकतात. शहरातील विठ्ठलनगरमधील बाळासाहेब रणधीर यांच्या घरासमोर असलेला विजेचा खांब मुळाशी सडला होता. तो खांब फक्त वीज वाहिन्यांच्या आधारावर उभा होता. या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या, मात्र वीजवितरण कार्यालयाकडून कोणतीच हालचाल झाली नाही. अखेर मंगळवारी हा खांब पडला. दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर रहदारी नव्हती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

विठ्ठलनगरमधील विजेचा खांब कोसळला, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. अनेक वेळा तक्रार करूनसुद्धा वीजवितरण कंपनी दखल घेत नाही, आता तरी दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी कर्जतमधील इतर धोकादायक खांब बदलावेत.

-सुनील गोगटे, रहिवासी, विठ्ठलनगर, कर्जत

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply