Breaking News

पनवेलमध्ये 176 कोरोनाबाधित

आठ जणांचा मृत्यू; 198 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 18) कोरोनाचे 176 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 198 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 139  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून  सात जणांचा मृत्यू झाला, तर 150 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 37 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर 48 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

नवीन पनवेल सेक्टर 18, पनवेल मुल्ला हमिद  मस्जिद, शांती निवास, भिंगारी एमएसईबी ऑफिसजवळ, कामोठे गणेश दर्शन सोसायटी, अल्कापुरी सोसायटी आणि खारघर ट्रायसिटी ग्रँड सोसायटीतील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  मंगळवारी  आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 33 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1704 झाली आहे. कामोठ्यामध्ये 26 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 2013  झाली. खारघरमध्ये 26 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1808 झाली आहे.

नवीन पनवेलमध्ये 28 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1695  झाली आहे. पनवेलमध्ये 22 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या  1623  झाली. तळोजामध्ये चार नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 551 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 9394 रुग्ण झाले असून 7786   रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.88 टक्के आहे. 1363 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 245  जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन 37 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये उलवे 11, करंजाडे आठ, सुकापूर चार, आकुर्ली तीन, विचुंबे, नेरे प्रत्येकी एक, तर शेडुंग, सांगडे, पाली-देवद, चिखले, भिंगार, न्हावा आणि कोन येथे प्रत्येकी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. बोर्ले येथील एका व्यक्तीचा 19 जुलै रोजी मृत्यू झाला होता. त्याचा रिपोर्ट मिळाला. 48 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2833 झाली असून 2376 जणांनी कोरोनावर मात केली, तर 60 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाडमध्ये 21 जणांना कोरोनाची लागण

महाड ः प्रतिनिधी

महाड तालुक्यात मंगळवारी (दि. 18) कोरोनाचे 21 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, नव्याने 21 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये प्रभात कॉलनी, सिटी प्राईड प्रभात कॉलनी, ढालकाठी, कुंभारवाडा बिरवाडी, मोहत, पिडीलाइट कॉलनी, कांबळे तर्फे बिरवाडी, हर्षा कॉम्प्लेक्स महाड, केएसएफ कॉलनी, आदर्शनगर बिरवाडी, बापटनगर बिरवाडी, सहारा कॉम्प्लेक्स बिरवाडी, गोमुख आळी येथील रुग्णांचा समावेश आहे. 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर अमेहत हौस महाड येथील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. महाडमध्ये एकूण 173 रुग्ण उपचार घेत असून, 530 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 33 जणांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यात आतापर्यंत 736 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

कर्जतमध्ये 12 जणांना संसर्ग

कर्जत ः प्रतिनिधी

कर्जत तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. व्यापारी, राजकारणी आणि आता संस्थाचालकांना कोरोनाने लक्ष्य केले आहे. मंगळवारी (दि. 18) 12 जणांना  कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बाधित रुग्णांमध्ये माजी सरपंच, संस्था तसेच सहकारी संस्था पदाधिकर्‍यांचा समावेश आहे. आजपर्यंत कर्जत तालुक्यात 690 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 587 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

मंगळवारी कर्जत शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायामशाळेच्या शेजारील इमारतीत राहणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सचिवपदाची जबाबदरी सांभाळणार्‍या तसेच कपालेश्वर देवस्थानचा विश्वस्त असलेल्या 38 वर्षांच्या युवकाचा आणि शेतकरी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष असलेल्या त्याच्या 58 वर्षांच्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोषाणे येथील माजी सरपंच असलेल्या 69 वर्षांच्या व्यक्तीलाही कोरोनाची बाधा झाली. तसेच दहिवली येथील एका 41 वर्षीय महिलेला व तिच्या 19 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. कशेळे येथील 49 वर्षांच्या महिलेचा व तिच्या मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कडाव येथील एका 69 वर्षांच्या व्यक्तीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. मोठे वेणगाव येथील एका 26 वर्षांच्या युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दहिवली संजयनगर येथील एका 38 वर्षीय व्यक्तीलासुद्धा कोरोनाची लागण झाली. मुद्रे बुद्रुक येथील नेमिनाथ अपार्टमेंटमधील एका 39 वर्षांच्या युवकाचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. नेरळ टेप आळीमध्ये एका 69 वर्षीय महिलेलासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.

उरणमध्ये कोरोनाचे 15 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

उरण तालुक्यात कोरोनाने कहर केला असून, रुग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. मंगळवारी (दि. 18) 15 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, तीन रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 16 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये भेंडखळ तीन, उरण दोन, जेएनपीटी, कोप्रोली, राधाकृष्ण मंदिराजवळ चिर्ले, करंजा सातघर, मोठी जुई, आवरे, गोवठणे, वेश्वी तलाठी ऑफिसजवळ, चिर्ले जासई, म्हातवली येथे प्रत्येकी एक अशा एकूण 15 रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जासई चार, उरण तीन, करंजा दोन, जेएनपीटी दोन, टाकीगाव, डोंगरी, विंधणे, वेश्वी, रांजणपाडा अशा एकूण 16 रुग्णांचा समावेश आहे, तर सोनारी, मोरा व उरण येथे प्रत्येकी एक अशा एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1180 झाली आहे. त्यातील 936 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 190 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.

रोह्यात 51 जणांची कोरोनावर मात

रोहे ः प्रतिनिधी

रोहा तालुक्याला मंगळवारचा (दि. 18) दिवस दिलासादायक ठरला असून या दिवशी कोरोनाबाधित व्यक्ती आढळण्याची संख्या घटली आहे, तर कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या वाढली आहे. मंगळवारी रोहा तालुक्यात तीन कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. त्यामुळे रोहा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 978वर पोहचली आहे. तसेच एकाच दिवशी 51 व्यक्ती कोरोनावर मात करून बरे होत घरी आल्या आहेत. रोहा तालुक्यात आतापर्यंत 765 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे, तर 26 व्यक्तींना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply