Breaking News

पेण चिंचपाड्यात एकावर चॉपरचे वार; गुन्हा दाखल

पेण : प्रतिनिधी

पेणमधील चिंचपाडा येथे जतीन पाटील हे मोटारसायकल वरून जात असताना आरोपी  याने त्यांच्यावर दगडाने वार करून साक्षीदारावर चॉपरने वार केल्याची घटना बुधवारी (दि. 27) सायंकाळी 5.35 च्या सुमारास घडली आहे. अधिक माहिती अशी, फिर्यादी जतीन चंद्रकांत पाटील रा. दया अपार्टमेंट, कवंडाळतळे, ता.पेण हे त्यांच्या मोटारसायकलने जात होते. त्यांच्या पाठीमागे नेहार किशोर परमार (रा.गोदावरीनगर) हे बसले होते. मोटारसायकल ही बाजार समिती पेण ते चिंचपाडा येथे जाणार्‍या रोडवर वॉशिंगसेंटर समोर आली असता आरोपी सूरज गणेश म्हात्र (रा. पीर डोंगरी) याने भांडणाचा रोष मनात धरून फिर्यादी यांच्या मोटारसायकलच्या पाठीमागून येवून पाटील यांना आवाज देत थांबण्यास सांगितले. पाटील हे न थांबल्याने आरोपी रा.पिरडोंगरी, ता.पेण याने पाटील यांना शिवीगाळ केली. आरोपी याने त्यांची मोटारसायकल थांबविली असता आरोपी हा मोटारसायकल वरून उतरून त्याने मसाला मिरचीपुड पाटील यांच्या तोंडावर फेकल्याने ते डोळे चोळू लागल्याने त्यावेळेस आरोपी याने फिर्यादी यांना धक्काबुक्की केली. रस्त्याच्या बाजूचा दगड उचलून पाटील यांच्या डोक्यात मारणार हे पाहून पाटील यांनी त्यास अडविण्यासाठी हात समोर धरला असता तो दगड फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पंजावर व डोक्यास मागच्या बाजूला लागला. तसेच उजव्या हाताचा पंजा फ्रॅक्चर होवून डोक्यास दुखापत झाली. तसेच साक्षीदार नेहरू परमार व दुसरा साक्षीदार दीपेश म्हात्रे रा. पीर डोंगरी हे फिर्यादी व आरोपी यांचे भांडण सोडवत असताना आरोपी याने  त्याच्याजवळील कटर चाकूचा वार पाटील यांच्या उजव्या मांडीवर करून दुखापत केली व पाटील यांच्या मोटारसायकलवर दगड मारून मोटारसायकलचे नुकसान केले. याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक कौशिक फेंगडू हे करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply