Breaking News

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे महिला दिन

पनवेल : बातमीदार : बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या संपूर्ण शाखांमधून मोठ्या उत्साहाने जागतिक महिला दिन साजरा केला. याच अनुषंगाने नवीन पनवेल शाखेच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा मोरे, जादूगार पी. बी. हांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप देशमुख, नवीन पनवेल उपशाखा प्रबंधक शैलजा ठकेकर, विशेष सहाय्यक व विपणन सदस्य अरविंद मोरे, खजांची सीमा मराठे, मीनाक्षी पवार आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्व महिला ग्राहकांचा, मान्यवरांचा बँकेतर्फे सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वामनराव गायकवाड, सतीश पारधे व रामचंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले. बँकेचा ग्राहकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply